शंभर वर्षांपूर्वीचे ‘बालविधवेचे गाणे’
बरोबर १०० वर्षांपूर्वी हरिभाऊ आपटे यांनी आपले करमणूक साप्ताहिक सुरू केले. ‘करमणूक’ काढण्याचा उद्देश स्पष्ट करताना हरिभाऊ यांनी म्हटले होते की, ‘केसरी सुधारकादि पत्रे आपल्या कुशल लेखणीने जे काम निबंधाच्या द्वारे करतात तेच काम हे पत्र मनाची करमणूक करून करणार.’ पुढे ते असे म्हणतात की, ‘ज्यांस पुढल्या माडीपासून चुलीपर्यंत व दिवाणखान्यातील टेबलापासून फणीकरंड्याच्या पेटीपर्यंत कोणाच्या …